सोलापूर : विद्यार्थ्यांनी चांगले शिकून आई-वडिलांचे स्‍वप्न साकार करावे : घनश्याम दरोडे | पुढारी

सोलापूर : विद्यार्थ्यांनी चांगले शिकून आई-वडिलांचे स्‍वप्न साकार करावे : घनश्याम दरोडे

केम ; पुढारी वृत्‍तसेवा विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर समाजात चांगला बदल घडवावा आणि आपल्‍या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे असे प्रतिपादन छोटा पुढारी घनश्याम दराडे याने केले. केम येथील श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल मध्ये त्‍याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर होते. या वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सचिन श्रृंगारे, ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ, सागर कुरडे, विष्णू पंत अवघडे, युवा सेनेचे तालुका समन्वयक सागर राजे तळेकर भाजपाचे गणेश आबा तळेकर, धनंजय ताकमोगे तसेच दिपक भिताडे, बापु तळेकर, दळवी सर, नाना तळेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना घनश्याम दराडेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्‍यााला शिक्षणाचे महत्‍व सांगितले आहे. त्‍यामुळे आपण चांगले शिक्षण घेउन आपल्‍यासोबत समाजाचा विकास साधायला हवा असे मत त्‍याने व्यक्‍त केले. आपण शेतकऱ्यांची मुले आहोत तुम्ही चांगले शिकूण आपल्या माय बाप शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करा असे आवाहनही त्‍याने केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे के, एन यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक कदम यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Back to top button