काँग्रेसच्या सत्तेत सरकारी खर्चाने चिमणी बांधणार : नाना पाटोले | पुढारी

काँग्रेसच्या सत्तेत सरकारी खर्चाने चिमणी बांधणार : नाना पाटोले

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : नियमाचा बाऊ करत भाजपने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली. कारखान्याच्या हजारो शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास शासनाच्या खर्चाने चिमणीची पुनर्निर्मिती करून देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

भाजपच्या माजी मंत्राचा बंगला अतिक्रमणात आहे. याबाबत विधानसभेत पुराव्यासह बाजू मांडू, असाही दावा पटोले यांनी केला. शुक्रवारी सायंकाळी पटोले यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याला भेट देत चिमणी परिसराची पाहणी केली. भाजप देशात सुडाचे राजकारण करत असून सूडाडापोटीच सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीवर कारवाई केली, असा दावा पटोले यांनी यावेळी केला. त्याचबरोबर भाजप ही संपुष्टात येणारी व्यवस्था असून येणार्‍या लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर अटळ आहे, असा दावाही यावेळी त्यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्धाराम चाकोते, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी उपस्थित होते.

      नाना पटोले म्हणाले…

  •  काडादी यांच्यासाठी काँग्रेस पक्षाची द्वारे सदैव उघडी श्र पक्षप्रवेश केल्यास मोठी संधी देऊ. श्र भाजपचे सरकार विरोधकांना स्वतःच्या पक्षात येण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत आहे. श्र भाजपचे सरकार शेतकरी व कामगार विरोधी. श्र बोरामणी विमानतळाचा विकास करण्याऐवजी सिद्धेश्वरची चिमणी पाडण्यातच सरकारने शक्ती केली खर्च. श्र निष्क्रिय खासदारामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाला मोठा फटका. श्र भाजप घाबरल्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही.

Back to top button