मंगळवेढा : चोरी झालेले 12 तोळे सोने मुळ फिर्यादीस परत | पुढारी

मंगळवेढा : चोरी झालेले 12 तोळे सोने मुळ फिर्यादीस परत

मंगळवेढा; पुढारी वृतसेवा : शहरातील मित्रनगर परिसरातील एका गुरुजीचा बंगला भरदिवसा चोरट्यांनी फोडून जवळपास 6 लाख 43 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला होता. पोलीसांनी प्रदिप धनाजी हेंबाडे (रा.ढवळस), अजित मेटकरी (रा.नागणेवाडी) या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 6 लाख 15 हजार रुपये किंमतीचे 12 तोळे 3 ग्रॅम सोने हस्तगत करुन न्यायालयाच्या आदेशाने ते मुळ फिर्यादीला परत करण्यात आले.

या घटनेची अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी बिभिषण धोंडीबा गवळी (रा.भालेवाडी, सध्या मित्रनगर) व पत्नी ज्योेत्सना हे दोघेजण शिक्षक असून ते दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या भालेवाडी येथील शेतात जवस काढण्याचे काम सुरु असल्याने बंगल्याला कुलूप लावून गेले होते. या संधीचा फायदा घेत वरील दोघा चोरट्यांनी त्या बंगल्यावर लक्ष केंद्रीत करुन लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 6 लाख 43 हजाराचा ऐवज चोरुन नेला होता. रात्री 7.45 वाजता फिर्यादी घरी परत आल्यानंतर चोरी झाल्याचे दिसून आले. डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी वरील दोघा चोरट्यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता चोरीचा गुन्हा कबूल केला व त्यांना अटक करुन न्यायालया पुढे उभे करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी वरील चोरीचा मुद्देमाल 6 लाख 15 किंमतीचे 12 तोळे 3 ग्रॅम सोने हस्तगत करुन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधीत गवळी कुटूंबियांच्या ताब्यात हा मुद्देमाल देण्यात आला. सदर आरोपी सध्या कारागृहात असून दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

Back to top button