अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकित भाजप गटाचे वर्चस्व | पुढारी

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकित भाजप गटाचे वर्चस्व

अक्कलकोट; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकित भाजपने वर्चस्व ठेवले आहे. या सत्ताधारी गटाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने १८ पैकी १२ जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले असले तरी महाविकास आघाडीने केलेले कामगिरी उल्लेखनिय ठरली आहे. निकाल जाहीर होताच भाजपचे कार्येकर्यांनी गुलालचे उधळण करीत एकच जल्लोष केला.

आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. सिद्रामप्पा पाटील प्रणित श्री स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्थामधून बाबुराव करपे ३५३ विजयी, आप्पासाहेब पाटील ३५४ विजयी, संजीव पाटील ३७८ विजयी, सिद्रामप्पा पाटील ३७६ विजयी, कामगोंडा बाके ३४८ विजयी, धनराज बिराजदार ३४० विजयी, विजयी, शिवमंगल बिराजदार ३७० पार्वतीबाई स्वामी ३५३, राजेंद्र बंदीछोडे ३७७ ,प्रकाश कुंभार ३७७, मल्लिकार्जुन पाटील ३५७,

महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार

सुरेश गड्डी ३३१, बसवराज तानवडे ३३४ मल्लिकार्जुन पाटील ३५७, सुमित बिराजदार ३२९, रविकिरण वरनाळे ३२२,कपिल शिंदे ३३१, महांतेष हत्तुरे ३०९, शकुंतला खरात ३५०, सुवर्णा मलगोंडा ३४१,शिवयोगी पुजारी ३४७,
३४७, असपाक अगसापुरे ३४५,विठठल विजापूरे ३३७ पराभूत सोसायटी मतदार संघातुन सत्ताधारी गटाचे एकमेव उमेदवार पराभूत झाले आहे.

आडते व्यापारी – भाजपचे श्रीसैल घिवारे ८४ बसवराज माशाळे ८४, विजयकुमार कापसे ७४, शंकर माशाळे-५,, शेरीकर-झिरो.
आघाडीचे हमाल/तोलर:-यलप्पा ग्वल-५९ विजयी, उमेश गायकवाड-०७ पराभूत

ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण (महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार) मल्लिनाथ ढब्बे ( १७३ ), कार्तिक पाटील( ४४५ विजयी ), आदित्य बिराजदार (१७६),रिपाईचे रेवणप्पा मडीखांबे ( ४६ ), शिवयोगी लाळसंगी ( ४१५ विजयी ),निरंजन हेगडे ( ०० ),

अनुसूचित जाती जमाती – यशवंत इंगळे ( १५८ ) ,सिद्धार्थ गायकवाड (४६९ विजयी ), राहुल रुही ( १६ ), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक – लक्ष्मीबाई पोमाजी ( १८३ ), प्रकाश बिराजदार ( ४६६ विजयी )

Back to top button