सोलापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील १७७ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 9 वाजता सुरु झाली. सकाळी 10: 30 ते 11 च्या सुमारास जवळपास जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचपायतीच्या निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले तर अनेक ठिकाणी सत्ताधार्‍यांनाच पराभवचा सामना करावा लागला.

उत्तर सेालापूर 

उत्तर सेालापूर तालुक्यातील कौवठाळी ग्रामपंचायतीमध्ये दोन प्रभागात चार उमेदवारांना समसमान मते पडली होती.त्यामुळे त्या ठिकाणी चिट्टीवर निर्णय घेण्यात आला तर पाकणी येथे एकाच प्रभागातील तीन महिला उमेदवारांना समसमान मते पडल्याने त्यांचा ही निर्णय चिट्टीवर घेण्यात आला.त्यामुळे मंगळवारी निकाला दरम्यान अनेक ठिकाणी धाकधूक तर अनेक ठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला.

उत्तर सेालापूर तालुक्यातील मार्डी या ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली. या ठिकाणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या सूनबाई तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा झाडे यांच्यात मोठी चुरस पाहिला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातील झाडे यांनी चांगलीच आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपाच्या पवार गटाची धाकधुक वाढली होती. नंतरच्या फेर्‍यात मात्र प्रांजली पवार यांना चांगलीच आघाडी मिळाली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांना सरपंचपदाच्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी ग्रामपंचायतीमध्ये ही धक्कादायक निकाल लागला असून सत्ताधार्‍यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सदस्य हरिदास शिंदे आणि भाजपाचे नेते माजी सरपंच सुनिल गुंड याच्या पॅनलचा धक्कादायक परावभव झाला आहे.

कौठाळी ग्रामपंचायत 

कौठाळी ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झालेअसून, स्थानिक भाजपा नेते संग्राम पाटील यांच्या गटाने सत्ता मिळविली आहे. तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवार अशोक जालिंदर जाधव आणि भक्ते समाधान उत्तरेश्‍वर यांना १८२ समसमान मते मिळाली. त्यामुळे त्या ठिकाणी चिट्टीवर अशोक जाधव यांची लॉटरी लागली. तर प्रभाग 3 मध्ये ही संग्राम प्रताप पाटील आणि माने शरद लक्ष्मण यांना 307 समसमान मते पडली. त्यामुळे त्या ठिकाणी ही चिट्टीवर शरद माने यांची लॉटरी लागली आहे.

पाकणी 

पाकणी येथील प्रभाग क्रमांक 3 मध्यील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी शालन गुंड, अंजली ढेंगळे आणि प्रणिता शिंदे यांना 149-149 समसमान मते पडली. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले. या ठिकाणी प्रणिता शिंदे यांना चिट्टीने तारले. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे सुपुत्र श्रीदीप हसापुरे हे चांगल्या फरकाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

पंढरपूर 

पंढरपूर तालुक्यातील तुगंत ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. त्याठिकाणी सरपंचपदी डॉ.आमृता रणदिवे या मोठ्या फरकाने निवडून आल्या आहेत. तर पंढरपूर तालुक्यातील 11 पैकी 7 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे तर उर्वरित ठिकाणी स्थत्तनिक आघाड्यांची सत्ता आली आहे.

दक्षिण सोलापूर 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांची पिछेहाट झाली असून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते गोपाळ कोरे यांच्या सूनबाई अनिता कोरे या मोठ्या मताधिक्यांने निवडून आल्या आहेत.

माढा, मोहोळ,करमाळा, अक्कलकेाट आणि बार्शी तालुक्यातील अनेक ठिकाणी सत्ताधार्‍यांना पराभवाचा समाना करावा लागला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी सत्ताधार्‍यांना नाकारुन नव्याने सत्तेची संधी दिल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत होते.

Back to top button