पंढरपूर : विठुरायाला 19 तोळे सोन्याचा चंदन हार अर्पण | पुढारी

पंढरपूर : विठुरायाला 19 तोळे सोन्याचा चंदन हार अर्पण

पंढरपूर : दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर कार्तिकी यात्रा निर्बंधमुक्त भरत आहे. यामुळे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणीस सोन्याचे दागिणे अर्पण केले जात आहेत. त्यामुळे विठुरायाच्या खजिन्यात विविध सोने चांदीच्या दागिन्यांची भर पडत आहे.

कल्याण येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे यांनी 11 लाख रुपये किंमतीचा 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदन हार विठुरायाला (दि. 2)
विठ्ठलास अर्पण केला. विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे या पंढरपूरात सहकुटुंब आल्या आहेत. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यापुर्वी मंदिर समितीच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विठ्ठलाच्या चरणी सोन्याचा चंदन हार अपर्ण करण्याची भावना व्यक्त केली.

Back to top button