श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्‍त करण्यासाठी याचिका दाखल करणार | पुढारी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्‍त करण्यासाठी याचिका दाखल करणार

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्‍त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे भाजपचे खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. येथील महाराज मंडळी, बडवे, उत्पात यांनी मुंबई येथील इस्कॉन मंदिरात डॉ. स्वामी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे संकेत दिले.

यावेळी ह. भ. प. रामकृष्ण महाराज वीर, राणा महाराज वासकर, विठ्ठल महाराज चौरे, श्रीराम बडवे, माऊली पालखी संघाचे अध्यक्ष गोसावी महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होते.

स्वामी म्हणाले की, देशातील सर्वच हिंदू मंदिरे सरकारमुक्त करण्यासाठी लढा उभारण्यात येत आहे. याची सुरुवात पंढरपूर येथून केली जााणार आहे. याकरिता मी पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला भेट देणार आहे. येथील हिंदू संघटना, महाराज मंडळी, वारकरी, स्थानिकांशी चर्चा करणार आहे. माझी टीम सर्वोच्च न्यायालयात याचिका लवकरच दाखल करणार असल्याचे सांगीतले. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षभरात 1 कोटीहून अधिक भाविक भेट देतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची वार्षिक उलाढाल 25 कोटीहून अधिक आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना पंढरपूरला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी निमंत्रण स्विकारले असून लवकरच ते पंढरपूरला येणार असल्याचे राणा महराज वासकर यांनी सांगीतले.

Back to top button