सोलापूर : करमाळा-टेंभुर्णी रस्ता बनला धोकादायक | पुढारी

सोलापूर : करमाळा-टेंभुर्णी रस्ता बनला धोकादायक

करमाळा;  पुढारी वृत्तसेवा :  करमाळा-टेंभुर्णी रोडवरील सांगवी फाटा येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जगताप गटाचे शंभुराजे जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे. करमाळा-टेंभुर्णी रोडवरील सांगवी फाटा येथे रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने येथे सतत अपघात होत आहेत.
वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. शंभुराजे जगताप यांनी करमाळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंकत्यांकडे निवेदन दिले आहे.

या रस्त्यावर झालेल्या अनेक अपघातांमध्ये लोकांनी जीव गमावला आहे. हा लवकरात लवकर तयार करण्यात यावा, बिटरगाव चौकात अपघात झाला तर त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी व संबंधित विभाग जबाबदार राहील, परिणामी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शंभुराजे जगताप यांनी दिला आहे.

Back to top button