स्‍वातंत्र्यदिन : श्री विठ्ठल मंदिरात तिरंगा आरास | पुढारी

स्‍वातंत्र्यदिन : श्री विठ्ठल मंदिरात तिरंगा आरास

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा :  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची तिरंगा आरास करण्यात आली. यामुळे मंदिरात उत्सव फुलला असून मंदिर मनमोहक दिसत आहे.

तिरंगा आरास
तिरंगा आरास

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रीं च्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. श्रींचा गाभारा व मंदिरात तिरंग्याचे स्वरूप देण्यात आले आहे.

तिरंगा आरास
तिरंगा आरास

याकरिता पुणे येथील विठ्ठल भक्त श्रीमंत मोरया प्रतिष्ठाण यांच्या वतीने आरकेड, कार्नेशन, शेवंती, कामिनी आदी प्रकारच्या 700 किलो पानाफुलांचा वापर करत तिरंग्‍याचे मनमोहक स्वरूप देण्यात आले आहे.

तिरंगा आरास

कोरोना च्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. असे असले तरी स्वातंत्र्य दिना निमित्ताने करण्यात आलेली आकर्षक फुलांची तिरंगा आरास, सजावटीचे दर्शन भाविकांना घर बसल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर, तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून घेता येत आहे. अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

Back to top button