पंतप्रधान मोदी यांच्याकडून ‘तावशी’ची दखल | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्याकडून ‘तावशी’ची दखल

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीचा केद्र सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागाने ट्विटरद्वारे गौरव केला आहे. ‘स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक 2’ अंतर्गत या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील याची दखल घेत तावशी ग्रामपंचायतीच्या योजनेच्यावेळी काम केलेल्या (तत्कालिन) सरपंच सोनाली यादव या ग्रामस्वच्छतेच्या कामाच्या आदर्श ठरल्याचा उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

तावशी ग्रामपंचायत
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तावशी गावासंदर्भात केलेले ट्विट.

तावशी गावच्या सरपंच सोनाली यादव यांनी सर्वांच्या सहकार्याने गाव हगणदारीमुक्त केले. परिणामी, त्या देशातील इतर सरपंचाना आदर्श ठरल्या आहेत, अशा शब्दात पाणी व स्वच्छता विभागाने ट्विट करून या गावाची दखल घेतली आहे. याबद्दल तत्कालिन सरपंच सौ. यादव यांचे अभिनंदन केले आहे.

‘स्वच्छ भारत’ या ट्विटरद्वारे केला आहे. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रुप वर आहेत. त्यांनी देखील लाईक करून ट्विटर हँडलवर प्रतिसाद दिला आहे. सध्या ओडिएफ टप्पा 2 चे काम देशात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशात चांगले काम केलेल्या ग्रामपंचायतीचा गौरव ट्विटरवर करून देशांतील ग्रामपंचायतींना प्रेरणा दिली आहे.

तत्कालिन सरपंच सोनाली यादव यांचा यात गौरव केला आहे. त्यांचेच पती गणपत भानुदास यादव हे विद्यमान सरपंच आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणेच्या सुचना केलेल्या आहेत. त्याचाच अंक भाग म्हणून ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत टाकाऊ असलेल्या बॅरेलपासून हॅन्डवॉश स्टेशन बनविले आहेत. सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची सोय करणारी तावशी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव तावशी ग्रामपंचायत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संत गाडगेबाबा अभियान अंतर्गत या ग्रामपंचायतीला मार्गदर्शन केले आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटविकास अधिकारी पिसे सुरेंद्र पिसे, शंकर बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सरपंच गणपत यादव व ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी स्वच्छतेत सातत्याने विविध उपक्रम राबविणेचा ध्यास घेतला आहे.

टाकाऊ बॅरेलपासून हँडवॉश स्टेशन

ग्रामसेविका ज्योती पाटील म्हणाल्या, ‘घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत बॅरेलपासून हँडवॉश स्टेशन बनविली आहेत. बॅरलला कलर देऊन वरील भाग कापून त्यांवर सिंक व तोटी बसविली आहे. खाली सांडपाणी साठा केला जातो. तसेच पाणी सोडणेसाठी आऊटलेट ची व्यवस्था केली आहे. पालक अधिकारी व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे यासाठी मार्गदर्शन मिळाले आहे.

Back to top button