सोलापूर : गौडगाव मधील जवान रामेश्वर वैजनाथ काकडे शहीद | पुढारी

सोलापूर : गौडगाव मधील जवान रामेश्वर वैजनाथ काकडे शहीद

वैराग(सोलापूर) ; पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर जिल्‍हातील गौडगाव  (ता. बार्शी) येथील बीएएसएफ मध्ये कार्यरत असलेले जवान रामेश्वर वैजनाथ काकडे हे रायपूर छत्तीसगड अतिरेकी हल्‍ल्‍यात शहीद झाले आहेत.

रामेश्वर काकडे यांना अतिरेक्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गौडगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली.

रामेश्वर काकडे यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले होते. त्‍यानंतर ते २०१२ साली ते जम्मू काश्मीर येथे बीएएसएफ मध्ये भरती झाले होते. त्यांची आई ही गृहिणी असून वडील शेती करतात. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी, पत्नी एक ३ महिन्याच्या मुलगा असा परिवार आहे.

तसेच, त्यांचे पार्थिव गुरूवारी पुणे येथे विमानाने येणार असून त्यांच्या मूळ गावी गौडगाव येथे गुरुवारी संध्याकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान आणण्यात येईल. त्‍यांचा अंत्यविधी मूळ गावीच होणार आहे अशी माहिती त्‍यांच्या नातेवाइर्कांनी दिली आहे. रामेश्वर यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button