सोलापूर : पालेभाज्यांचे दर वाढले; फळाची मागणी वाढली | पुढारी

सोलापूर : पालेभाज्यांचे दर वाढले; फळाची मागणी वाढली

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यात पालेभाज्यांचे दर स्थिर होते. परंतु या आठवड्यात पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. विशेषतः कोथिंबीर, मेथीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने फळांची मागणी वाढली आहे.

ज्युस करण्यासाठी कलिगड, चिक्कू, डाळिंब, मोसंबी, खरबूज, द्राक्ष लागत असल्याने या फळांची मागणी वाढली आहे. चिक्कूचे दर पडले आहेत, तर कलिंगडचे दरदेखील अधिक नाहीत. द्राक्ष किरकोळ प्रती किलो 30 ते 40 रुपये दराने विक्री केली जात आहे. लिंबूच्या दरामध्येदेखील वाढ झाली आहे. यंदा लवकरच आंब्याची सुरूवात बाजारात झाली आहे, तर वांगी, मिरची, गवारीला चांगला दर मिळत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेपू (प्रती शंभर पेंडीस) 400 ते 600, पालक 200 ते 300, मेथी 300 ते 600, कोथिंबीर 300 ते 700, कांदा पात 300 ते 600, राजगिरा 300 ते 400, टोमॅटो (प्रती दहा किलो) 10 ते 70, दोडका 50 ते 300, बटाटा 70 ते 150, मुळाशेंगा 150 ते 300, लिंबू 200 ते 600, भेंडी 150 ते 450, मिरची 320 ते 700, घेवडा 40 ते 100, लसूण 170 ते 540, फ्लॉवर 640 ते 1180, गवार 600 ते 800, गाजर 60 ते 160, ढोबळी मिरची 300 ते 500, कोबी 40 ते 60, वांगी 50 ते 300, कारली 20 ते 40, सफरचंद 1000 ते 1600, चिकू 70 ते 160, द्राक्ष 80 ते 160, पेरू 900 ते 2000, खरबूज 200 ते 500, आंबा 2000 ते 3200, मोसंबी 150 ते 500, पपई 600 ते 1200, डाळिंब 1000 ते 15000, कलिगंड 1000 ते 3000, गहू 2280 ते 3075, तांदूळ 2700 ते 6010, तूर 5500 ते 5700, कांदा 100 ते 2400, गुळ 2540 ते 2937, हरभरा 4450 ते 4675 रूपये आहे.

 

Back to top button