कस्तुरींसाठी सातार्‍यात आज ‘उत्सव नात्यांचा’; दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व झी मराठीतर्फे आयोजन | पुढारी

कस्तुरींसाठी सातार्‍यात आज ‘उत्सव नात्यांचा’; दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व झी मराठीतर्फे आयोजन

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षारंभ व मकर संक्रांतीनिमित्त दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व झी मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरींसाठी सातार्‍यात गुरुवार, दि.19 जानेवारी रोजी दुपारी 4 वा. शाहूकला मंदिर येथे ‘उत्सव नात्यांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. झीच्या कलाकारांबरोबर गपशप व हळदी-कुंकू समारंभासह वाण वाटप असा दुहेरी योग साधला जाणार आहे.

सर्वत्र नववर्षाचे स्वागत उल्हासात होत असताना दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब, सातारा या नववर्षाच्या उत्साहात भर घालत मनोरंजनाच्या धमाकेदार कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यावेळी झी मराठीवरील लोकप्रिय कलाकारांबरोबर आनंदोत्सव साजरा करण्याची संधी कस्तुरी सभासदांना मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रायोजक कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स असून गिफ्टस् प्रायोजक तनिष फार्मिंग ज्वेलर्स हे आहेत. या कार्यक्रमामध्ये कस्तुरी सभासदांसाठी लकी ड्रॉ, कलाकारांसोबत गपशप तसेच झी मराठीतर्फे सुरेल गाणी, धमाल डान्स परफॉर्मन्स असणार आहे. यावेळी झी मराठी फेम ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेतील सरिता मंत्री आणि अंकिता मंत्री फेम सुकन्या कुलकर्णी व स्वानंदी टिकेकर तसेच ‘दार उघड बये’ मालिकेतील मुक्ता आणि सारंग फेम सानिया चौधरी व रोशन विचारे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, खेळ व शूटिंगदरम्यान होत असलेल्या गंमती-जंमती प्रत्यक्ष कलाकारांच्या तोंडून ऐकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व वाण वाटप करण्यात येणार आहे. वाणस्वरुपात सभासदांना तनिष फार्मिंगचे गिफ्ट कूपन दिले जाणार असून लकी ड्रॉही काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8104322958 या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘लकी ड्रॉ’चा होणार वर्षाव…

  • दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या ‘झी मराठी उत्सव नात्यांचा’ या कार्यक्रमात सहभागी कस्तुरी सभासदांवर ‘लकी ड्रॉ’द्वारे आकर्षक गिफ्टचा वर्षाव होणार आहे.
  • या ‘लकी ड्रॉ’मध्ये 1 ग्रॅमचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण, गिझर, ड्रेसिंग टेबल, शॉपिंग बॅग, साडी आदी जिंकण्याची संधी कस्तुरींना मिळणार आहे.

Back to top button