महाबळेश्वर : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कोठडी | पुढारी

महाबळेश्वर : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कोठडी

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा ; महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम गावात राहणाऱ्या एका पाच वर्षीय बालिकेवर गावात पाहुणा म्हणून आलेल्या ५९ वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील संशयिताला खेड जि. रत्नागिरी येथे अटक करण्यात आली.

रमेश कृष्णा जाधव (सध्या रा. पुणे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना दि. १० जानेवारी रोजी घडली आहे. त्यानुसार संशयितावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याबाबतची तक्रार मुलीच्या आजोबांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली.

अतिदुर्गम भागातील एका गावातील ही बालिका घरात टिव्ही पाहत होती. याचवेळी संशयित रमेश जाधव याने तिच्यावर अत्याचार करून पळ काढला. हा संशयित या गावात पाहुणा म्हणून आला होता. या बालिकेने घडलेला प्रकार घरातील लोकांना सांगितला. पिडीत मुलीच्या आजोबांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रार दाखल केली असून महाबळेश्वर पोलिसांनी रमेश कृष्णा जाधव याच्यावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बालिकेवर अत्याचार करून पळ काढलेल्या या संशयिताचा महाबळेश्वर पोलीस कसून शोध घेत होते. हा संशयित खेड जि. रत्नागिरी येथे गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने खेड पोलिसांशी संपर्क साधला. रत्नागिरी पोलिसांच्या डायल ११२ या संपर्क क्रमांकावर संबंधित संशयित खेड बसस्थानकात वावरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे सपोनि गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा.

रुपेश जोगी यांनी संशयिताला ताब्यात घेत महाबळेश्वर पोलिस पथकाच्या हवाली केले. पोलिसांनी संशयितास अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरिक्षक रऊफ इनामदार, नवनाथ शिंदे करत आहेत.

Back to top button