सातारा : महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात दरड कोसळली; रस्‍ता वाहतुकीसाठी बंद | पुढारी

सातारा : महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात दरड कोसळली; रस्‍ता वाहतुकीसाठी बंद

सातारा ; पुढारी वृत्तसेवा सातारा महाबळेश्वर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळून सातारा महाबळेश्वर रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. परतीच्या पावसाने देखील धुमाकूळ घातला आहे. यातच जिल्ह्यात महाबळेश्वर-सातारा घाट रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असतानाच या घाटात केरघळ घाटात आज (शुक्रवार) सकाळी दरड कोसळून हा घाट रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अद्यापही बांधकाम विभागाने ही दरड हटवण्यास सुरुवात केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

या घाटामध्ये सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात हा रस्ता किमान चार महिन्यात दहा ते बारा वेळा बंद होतो. दरडी कोसळल्याने वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असणारा हा केरघळ घाट वाहतुकीसाठी सुरक्षित कधी होईल असा सवाल देखील वाहन चालकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. यातच सकाळी भली मोठी दरड आणि दगडांचा ढीग रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद झाला आहे.

हेही वाचा :  

Back to top button