सातारा : लोणंद पोलीस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

सातारा : लोणंद पोलीस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

लोणंद; पुढारी वृतसेवा : लोणंद पोलिसांच्या कोठडीत असलेल्या दिंगबर आगवणे या संशयीत आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी लोणंदच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नांदल (ता. फलटण) येथील एका गुन्ह्याप्रकरणी त्याला लोणंद पोलिसांनी अटक केली आहे.

फलटण न्यायालयाने दिंगबर आगवणे याला ३० ऑगस्टप्रर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याने कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे आज सकाळी पोलिसांच्या निर्दशनास आले. त्याला उपचारासाठी लोणंद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे, सपोनि विशाल वायकर यांनी त्वरीत धाव घेतली.

हेही वाचा :

Back to top button