बेळगाव सीमाप्रश्नी तब्बल ५ वर्षानी सुप्रीम कोर्टात सुनावणी; राज्‍याची बाजू भक्‍कमपणे मांडण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव प्रश्नावर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल पाच वर्षांनी हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येत असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकाप्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत राज्याची बाजू भक्कमपणे मांडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात बेळगाव प्रश्नावर होणारी सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. यापूर्वी २०१७ साली या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी या प्रश्नावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी, शिवाजीराव जाधव हे महाराष्ट्र राज्याची बाजू मांडणार आहेत. तर राज्याकडून अप्पर सचिव सदाफुले हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कर्नाटक राज्याने दाखल केलेल्या १२ अ या अंतरिम अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूनावणीबद्दल माहिती घेऊन या सुनावणीबाबत दिल्लीतील वकिलांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. काहीही झाले तरीही सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news