सातारा : टपाल विभागाकडून अपघात विमा योजना | पुढारी

सातारा : टपाल विभागाकडून अपघात विमा योजना

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अपघात विमा योजना आणली आहे. या योजनेत दरमहा 299 किंवा 399 रूपये भरून विमाधारकास 10 लाख रूपयांचे विमा संरक्षण दिले जात आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी पोस्टमन व आवश्यक असणारे कर्मचारी घरोघरी जावून या योजनेत सहभागी करून घेत आहेत.

यामध्ये 399 आणि 299 रूपये असे दोन प्रकार आहे. यामध्ये 299 रूपये विमा योजनेला शिक्षण खर्च, वाहतूक खर्च व अंत्यसंस्कार लागू होत नाही. या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा असून एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी विमा योजनेचे तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये नूतनीकरण करावे लागेल. या योजनेच्या लाभासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते आवश्यक आहे.

दरम्यान, साहसी खेळांमध्ये सहभागी झालेले खेळाडू, लष्कर, नौदल, हवाई आणि पोलीस दलातील व्यक्ती, पूर्वीचे आजार असलेली व्यक्‍ति, उपचार करणारे डॉक्टर स्वत: विमाधारक असल्यास किंवा त्यांच्याजवळील सदस्य, आत्महत्या, ड्रग्ज, अल्कोहोल किवा मादक पदार्थाच्या सेवनाने झालेला अपघात. बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान, गुन्ह्यातील सहभाग, विषारी, स्फोटक इतर धोकादायक गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसताना रुग्णालयात घेतलेला उपचार, व्यवसायिक चालक, हाडांचा ठिसूळपणाने होणारे नुकसान, खाण कामगार, बांधकाम कामगार या घटकांना या योजनांचा लाभ होणार नाही. बहुतांश घटकांना या योजनेतू वगळण्यात आल्याने किती जणांना या योजनेचा लाभ होणार यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत.

अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा संरक्षण रूग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रूपये रूग्णालय खर्चासाठी 10 हजार वाहतूकीसाठी 25 हजार अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रूपये विमा धारकाच्या मुलास शिक्षणासाठी 1 लाख मदत.

Back to top button