सातारा : बाजार समित्यांच्या निवडणुका ऑगस्टनंतरच | पुढारी

सातारा : बाजार समित्यांच्या निवडणुका ऑगस्टनंतरच

सातारा : पुढारी वृत्तसेवा उच्च न्यायालयाने निवडणुका बाकी असलेल्या 2587 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया ऑगस्ट अखेर पार पडल्यानंतर निवडणूक प्रक्रिया घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सातार्‍यासह राज्यभरातील बाजारसमित्यांच्या निवडणुका ऑगस्टमध्येच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सरकारने निवडणुका घेवू नका असे सांगितल्याने संचालक मंडळाला 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली. मात्र, त्यापेक्षा अधिक मुदत देता येत नसल्याने बाजार समित्यांवर प्रशासक आहे. सातारा जिल्ह्यात 10 बाजारसमित्या आहेत. यामध्ये दहिवडी बाजारसमितीची निवडणूक झाली आहे.

तर कराड बाजारसमितीची निवडणूक लांबणीवर आहे. सातारा, वाई, मेढा, फलटण, लोणंद, वडूज, कोरेगाव आणि पाटण या बाजारसमित्यांवर सध्या प्रशासक आहे. मुदत संपून दीड वर्षे झाल्यानंतरही निवडणुका न झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कोरोनानंतर सरकारने सहकार विभागातील निवडणुकांवर भर दिला. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यातील 800 हून अधिक सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. परंतु, याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गेले काही महिने निवडणुकांबाबत निर्णय झाला नाही. बाजार समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य शासनाने अगोदर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण कराव्यात, त्यानंतर बाजार समित्यांची निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले आहेत.

राज्यातील हजारो सोसायट्यांच्या निवडणुका बाकी असल्याचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला होता. या अहवालावर उच्च न्यायालयाने ऑगस्टअखेर उर्वरित सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पाडावी. त्यानंतर बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने निवडणुका बाकी असलेल्या 2587 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया ऑगस्ट अखेर पार पडल्यानंतर निवडणूक प्रक्रिया घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सातार्‍यासह राज्यभरातील बाजारसमित्यांच्या निवडणुका ऑगस्टमध्येच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सरकारने निवडणुका घेवू नका असे सांगितल्याने संचालक मंडळाला 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली. मात्र, त्यापेक्षा अधिक मुदत देता येत नसल्याने बाजार समित्यांवर प्रशासक आहे. सातारा जिल्ह्यात 10 बाजारसमित्या आहेत. यामध्ये दहिवडी बाजारसमितीची निवडणूक झाली आहे. तर कराड बाजारसमितीची निवडणूक लांबणीवर आहे. सातारा, वाई, मेढा, फलटण, लोणंद, वडूज, कोरेगाव आणि पाटण या बाजारसमित्यांवर सध्या प्रशासक आहे. मुदत संपून दीड वर्षे झाल्यानंतरही निवडणुका न झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कोरोनानंतर सरकारने सहकार विभागातील निवडणुकांवर भर दिला. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यातील 800 हून अधिक सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. परंतु, याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गेले काही महिने निवडणुकांबाबत निर्णय झाला नाही. बाजार समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य शासनाने अगोदर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण कराव्यात, त्यानंतर बाजार समित्यांची निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले आहेत. राज्यातील हजारो सोसायट्यांच्या निवडणुका बाकी असल्याचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला होता. या अहवालावर उच्च न्यायालयाने ऑगस्टअखेर उर्वरित सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पाडावी. त्यानंतर बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत.

Back to top button