महिलांसाठी आज ठसकेबाज लावणीचा नजराणा | पुढारी

महिलांसाठी आज ठसकेबाज लावणीचा नजराणा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने महिला व युवतींसाठी ‘ठसकेबाज लावण्यांचा नजराणा’ हा कार्यक्रम शनिवार, दि. 25 जून रोजी सायं. 4 वा. शाहू कला मंदिर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात कलारत्न ग्रुपमधील कलाकार लावण्या सादर करणार आहेत. यावेळी उपस्थितांना मनोरंजनाबरोबरच आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला राहणार आहे.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यापूर्वीही कस्तुरी क्लबने महिलांचे मनोरंजन व प्रबोधन करणार्‍या आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ठसकेबाज लावण्यांचा कार्यक्रम सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सादर होणार असून यामध्ये मदमस्त अप्सरा हिंदी, मराठी गाण्यांवर ठसकेबाज लावणी नृत्य सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक म्हसवडकर सराफ प्रा. लि. ज्वेलर्स हे असून, त्यांच्याकडून कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तसेच कस्तुरी सभासदांना सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीत मजुरीवर 10 टक्के सवलतीचे कूपनही दिले जाणार आहे.

या कार्यक्रमास विश्रांती टुर्सचे सहकार्य लाभणार आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला असून जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दै.‘पुढारी’ सातारा कार्यालय, फोन नंबर 8104322958 येथे संपर्क साधावा, असेे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button