विद्यार्थ्यांची गुणांवरून पात्रता न बघता त्यांची क्षमता बघा: प्रा. शिंदे | पुढारी

विद्यार्थ्यांची गुणांवरून पात्रता न बघता त्यांची क्षमता बघा: प्रा. शिंदे

सातारा : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात प्राविण्य आहे त्यामध्ये पुढे गेलेच पाहिजे. पण त्यासोबतच विविध कोर्सेसही केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या गुणांवरून पात्रता न बघता त्यांची क्षमता बघितली पाहिजे. त्यानुसारच त्यांना विविध कोर्सेस द्यावेत, असे मत दिशा अ‍ॅकॅडमी वाईच्या प्रा. अपर्णा शिंदे यांनी व्यक्त केले. दै. ‘पुढारी’ आयोजित एज्यु दिशा 2022 व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत शिक्षण विषयक प्रदर्शनात तुम्ही तुमचे योग्य करिअर कसे निवडाल ? या विषयावर त्या बोलत होत्या. प्रा. अपर्णा शिंदे म्हणाल्या, आयआयटी, जेईई, नीटसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी बर्‍याच कोचिंग क्लासेसमध्ये फाऊंडेशन कोर्सेस सुरू झाले आहेत. त्यामुळे पालकांना प्रश्न पडू लागले आहेत.

आता आपण पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना फाऊंडेशन कोर्सेस देत आहोत. स्कूल आणि फाऊंडेशन कोर्सेसची नवीन संकल्पना दिशा अ‍ॅकडमीने समोर आणली आहे. इयत्ता पहिलीपासून फाऊंडेशन कोर्सेस विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांचे आयआयटीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. फाऊंडेशन कोर्सेसमध्ये राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहेत. अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न असते. त्या वाटचालीत शैक्षणिक पार्श्वभूमी कशी असली पाहिजे? तुम्ही कशी तयारी केली पाहिजे? 11वी व 12वी पासून कोणते बेसिक कोर्सेस केले पाहिजे. याची तयारी करत असताना शास्त्रीयदृष्ट्या नियोजन कसे करावे?

शैक्षणिक वर्षाचे कसे नियोजन करावे? याची माहिती देत प्रा. शिंदे म्हणाल्या, इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च यासह विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात दिशा अ‍ॅकडमी 10 ते 12 वर्षापासून काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करत असताना दोन तास अभ्यास करण्यापेक्षा जास्तीत जास्त हार्ड वर्क केल्यास नक्कीच यश मिळणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Back to top button