सातारा : जिल्ह्यात ग्रामपंचायतींची 115 कोटींची करवसुली | पुढारी

सातारा : जिल्ह्यात ग्रामपंचायतींची 115 कोटींची करवसुली

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील 1 हजार 492 ग्रामपंचायतीच्या खातेदारांंकडे पाणी पट्टी व घरपट्टीच्या थकीत करवसुलीसाठी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत घरपट्टीची सुमारे 78 कोटी 63 लाख 5 हजार रुपये तर पाणीपट्टीची 36 कोटी 32 लाख 45 हजार असे मिळून 114 कोटी 95 लाख 5 हजार रुपयांची करवसुली झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत देण्यात आली. करवसुलीसाठी ठिक ठिकाणी पथकांची व नागरिकांची बाचाबाची झाली तर काही ठिकाणी नळकनेक्शन तोडण्यात आली.

जिल्ह्यातील 1 हजार 492 ग्रामपंचायतींनी थकीत करवसुलीसाठी मोहिम राबवण्याचा निर्णय तालुकास्तरावर घेतला. त्यासाठी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तर काही खातेदारांना तोंडी सूचनाही देण्यात आल्या होत्या. कर वसुलीसाठी 4 ते 5 गावातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांंची पथके तैनात करण्यात आली होती. थकीत कर न भरणार्‍याचे नळकनेक्शन तोडणे अशा कडक कारवाईचा अवलंब करण्यात आल्याने नागरिकांनी थकीत कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात येवून भरली. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करवसुली झाली.

सातारा तालुक्यात 191 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 15 कोटी 68 लाख 12 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 6 कोटी 10 लाख 27 हजार रुपये, कोरेगाव तालुक्यात 142 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 5 कोटी 59 लाख 1 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 4 कोटी 35 लाख 48 हजार रुपये, खटाव तालुक्यात 133 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 4 कोटी 67 लाख 33 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 3 कोटी 38 लाख 36 हजार रुपये, माण तालुक्यात 95 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 3 कोटी 27 लाख 79 हजार रुपये वसुल झाले. तर पाणी पट्टीची 1 कोटी 52 लाख 51 हजार रुपये, फलटण तालुक्यात 131 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 7 कोटी 67 लाख 4 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 3 कोटी 91 लाख 35 हजार रुपये वसुल झाले.

खंडाळा तालुक्यात 63 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 9 कोटी 11 लाख 12 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 2 कोटी 13 लाख 37 हजार रुपये, वाई तालुक्यात 99 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 4 कोटी 18 लाख रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 3 कोटी 75 लाख 30 हजार रुपये, जावली तालुक्यात 125 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 2 कोटी 45 लाख 43 हजार रुपये वसुल झाले, तर पाणी पट्टीची 1 कोटी 40 लाख 2 हजार रुपये, महाबळेश्‍वर तालुक्यात 79 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 2 कोटी 40 लाख 25 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 59 लाख 2 हजार रुपये, कराड तालुक्यात 200 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 17 कोटी 48 लाख 2 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 6 कोटी 69 लाख 93 हजार रुपये, पाटण तालुक्यात 234 ग्रामपंचायतीमधील घरपट्टी 6 कोटी 10 लाख 76 हजार रुपये वसुल झाले तर पाणी पट्टीची 2 कोटी 46 लाख 66 हजार रुपये वसुली झाली. घरपट्टी 90.75 टक्के तर पाणी पट्टी 90.98 टक्के वसुल झाली. जिल्ह्यात ग्रामपंचायतींची 115 कोटींची करवसुली झाल्याने गावोगावच्या विकास कामांना आता गती येणार आहे.

ग्रामपंचायतीच्या थकीत पाणी व घरपटटी वसुलीसाठी गावोगावी मोहिम राबवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात करवसुली झाली आहे. करवसुलीमुळे गावोगावच्या विकास कामांना आता वेग येणार आहे.
– अर्चना वाघमळे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)

Back to top button