कराड : ‘पुढारी’च्या रेस्क्यु बोटीने वाचवले १५ जणांचे प्राण | पुढारी

कराड : ‘पुढारी’च्या रेस्क्यु बोटीने वाचवले १५ जणांचे प्राण

कराड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तारळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

तारळी पूल पाण्याखाली गेल्याने पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा मंदिरासह मंदिर परिसर व व्यापारी पेठेला पुराचा वेढा पडला होता.

अधिक वाचा :

या पुरात अनेक नागरिक अडकले होते. कराड नगरपालिकेने ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यु ऑपरेशन करून पंधरा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले.

दै. ‘पुढारी’ रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अत्याधुनिक यांत्रिक बोट, दहा जीवनरक्षक जॅकेट, लहान मुलांसाठी पाच जीवनरक्षक जॅकेट, दहा बिओ रिंगसह अन्य साधने काही महिन्यांपूर्वी प्रदान केली होती.

अधिक वाचा :

यावेळी यांत्रिक बोटीसह जीवनरक्षक जॅकेट व बिओ रिंग आदी साहित्य कराड पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले होते.

या बोटीमुळे पाल येथील नागरिकांना पूरामधून यशस्विरित्या बाहेर काढण्यात आले. ‘पुढारी’ ने दिलेल्या रेस्कू बोटीमुळे नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आल्यामुळे कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दै. ‘पुढारी’चे आभार मानले.

अधिक वाचा :

Back to top button