कुंद्राचा सहकारी म्हणाला, पोर्न नव्हे सॉफ्ट पोर्न फिल्म बनवायचो! | पुढारी

कुंद्राचा सहकारी म्हणाला, पोर्न नव्हे सॉफ्ट पोर्न फिल्म बनवायचो!

मुंबई, पुढारी ऑनलाईन:  पोर्न व्हिडिओ रॅकेटचा मुख्य सूत्रधार राज कुंद्रा याचा साथीदार तनवीर हाशमीने आपण पोर्न नव्हे तर सॉफ्ट पोर्न फिल्म बनवत होतो, असा दावा केला आहे. पोर्न फिल्म रॅकेट प्रकरणी हाशमीच्या पोलिस चौकशीत त्याने सॉफ्ट पोर्न फिल्प बनवत असल्याची कबुली दिली आहे.

अधिक वाचा:

पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये राज कुंद्रा, तनवीर हाशमीसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी रविवारी तनवीरची तीन तास कसून चौकशी केली.

तनवीर हाशमीची सलग तीन तास चौकशी केली. यात तनवीरने सांगितले की, ते पॉर्नोग्राफी फिल्म नाही तर न्यूडिटी असलेल्या शॉर्ट फिल्म बनवायचे. अशा फिल्मना सॉफ्ट पॉर्न म्हटले जाते.

याआधी राजच्या वकिलांपासून ते शिल्पा आणि अन्य काही आरोपींनी त्यांच्या जबाबामध्ये म्हटले होते की ते  ॲडल्ट फिल्म बनवत नव्हते.

धिक वाचा:

तनवीर हाशमी सध्या जामिनावर आहे आणि त्याला राज कुंद्रा प्रकरणाबाबत चौकशीसाठी रविवारी बोलावले होते.

या चौकशीत त्याने आपण राज कुंद्रा याला कधीच भेटलो नव्हतो असे सांगितले.

तनवीर हा राज कुंद्राच्या ॲपसाठी कंन्टेट तयार करत असे. परंतु तो कधीही त्याच्या थेट संपर्कात नव्हता.

तनवीरने सांगितले की तो २० ते २५ मिनिटांच्या न्यूड शॉर्ट फिल्म बनवायचा. अशा फिल्मना थेट पॉर्न न म्हणता सॉफ्ट पॉर्न म्हटले जाते.

साक्षीदार होण्यास नकार

चौकशीवेळी पोलिसांनी त्याला साक्षीदार होण्याबाबत विचारले असता, मी कोणताही गुन्हा केला नाही. त्यामुळे साक्षीदार होण्याचा प्रश्नच येत नाहीत असे त्याने उत्तर दिले.

मेहुणीला ब्रेक देण्याची तयारी

गहना वशिष्ठ हिने मोठा खुलासा केला आहे. राज कुंद्राकडून नव्या ॲपची तयारी सुरू होती. त्यात तो शमिता शेट्टीला ब्रेक देणार होता. गहना वशिष्ठ हिने राज कुंद्रावर याआधाही आरोप केला आहे.

हेही वाचले का: 

Back to top button