उदगांव येथे सांगली कोल्हापूर- महामार्ग सुरू, १० वाजता दुचाकी सोडणार | पुढारी

उदगांव येथे सांगली कोल्हापूर- महामार्ग सुरू, १० वाजता दुचाकी सोडणार

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : उदगांव (ता. शिरोळ) येथील सांगली- कोल्हापूर महामार्ग शनिवारी (दि.२४) रोजी सायंकाळी पाण्याखाली गेला होता. त्यामुळे इंधन, गॅस, ऑक्सिजन, जीवनाश्वक वस्तू यासह विविध वाहतूक ठप्प झाली होती. तर आज मंगळवारी सकाळी ७ वाजता उदगांव येथील पाणी कमी झाल्याने तसेच रेल्वे ओव्हरब्रीजजवळ पाणी उतरल्याने जेसीबीच्या सहाय्याने ट्रायल घेण्यात आली. त्यांनतर मोठी वाहने सोडण्यात आली. तर आणखी २ तासांनी दुचाकी सोडण्यात येणार आहेत.

तर प्रामुख्याने पेट्रोल, डिझेल, गॅस, किराणा, ऑक्सिजन, औषधे यासह विविध साहित्य वाहनांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर सांगली कोल्हापूर महामार्ग वर थांबलेली वाहने सोडण्यात येणार आहेत. याठिकाणी जयसिंगपूर पोलिस वाहतूक व्यवस्था सांभाळत आहेत.

दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयाजवळ महामार्गावर महापुराचे पाणी ओसरल्याने ३ दिवसांनंतर वाहतूक सुरू झाली आहे.

शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा व वारणा नदीच्या पाण्यामुळे ४३ गावांत महापूर आला.

त्यामुळे ५२ हजार नागरिकांना स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर २२ हजार जनावरे स्थलांतर करण्यात आली.

सोमवारी सकाळी १० वाजता प्रथम अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली.

तसेच अत्यावश्यक वाहने कोल्हापूरच्या दिशेने सोडण्यात आली. सकाळी ७ वाजता रस्त्यावर प्रात्यक्षिक घेण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३६६ गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पंचगंगा नदीने विक्रमी ५६ फूट तीन इंच पाणी पातळी गाठली होती. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर जलमय बनले होते.

आता हळूहळू पूर ओसरत आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुर्ववत होत आहे.

हे ही पाहा : 

Back to top button