सांगली शहर राडेराड, दुर्गंधीचे साम्राज्य, कृष्णेची पाणी पातळी ४८ फुटांवर | पुढारी

सांगली शहर राडेराड, दुर्गंधीचे साम्राज्य, कृष्णेची पाणी पातळी ४८ फुटांवर

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  सांगली शहर परिसरातील काही ठिकाणचा महापूर ओसरला असून, काही ठिकाणी अद्याप महापूराचे पाणी आहे. महापूर ओसरलेल्या ठिकाणी सांगली शहर राडेराड झाले आहे. असून साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु शहरात महापूर ओसरलेल्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. सांगली आयर्विन पूलाजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजता ४८.९ इतकी पाणी पातळी होती. त्यामुळे अद्याप काही ठिकाणाचे पाणी ओसरण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा

कृष्णेची पातळी ४८.१ फुटांवर

सांगलीत आयर्विन पूल येथे कृष्णेची पाणी पातळी अद्याप ४८.१ फुटांवर आहे. त्यामुळे टिळक चौक आणि कर्नाळ रस्ता या दोन्ही मार्गावर अद्यापही पाणी आहे.

सांगलीवाडीत मगरीची तीन पिल्ली आढळली

महापूराचे पाणी सांगलीवाडीत मोठ्या प्रमाणात शिरले होते. अनेक घरे पाण्याखाली गेली होते. महापुरामुळे कृष्णेतून बाहेर पडलेल्या मगरींची पिल्ली सांगलीवाडीमध्ये आढळून आले.

तसेच मौजे डिग्रज येथे घराच्या छतावर मोठी मगर आढळून आली.

अधिक वाचा

दरम्यान त्यांना पुन्हा महापुरात सोडून देण्यात आले.मगरीची तीन पिल्ले आढळून आल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साप पकडण्यासाठी वन विभागाचा कॅम्प

सांगली शहरात मोठ्या प्रमाणात साप आढळून येत आहेत. ते पकडण्यासाठी वन विभागाने शहरात कॅम्प उभारला आहे.

सांगली-कोल्हापूर संपर्क अद्याप तुटलेलाच

सांगली-कोल्हापूर रस्ता अद्याप बंद असून वाहतूक खोळंबली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकजण सांगलीत अडकले असून महापूर कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथील महापूर ओसरण्याची प्रतिक्षा आहे.

अधिक वाचा 

पाहा व्‍हिडीओ :बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…

 

Back to top button