काँग्रेस पक्षामुळेच संसदेचे कामकाज ठप्‍प : पंतप्रधान नरेंद्र माेदी | पुढारी

काँग्रेस पक्षामुळेच संसदेचे कामकाज ठप्‍प : पंतप्रधान नरेंद्र माेदी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : संसदेचे कामकाज ठप्प हाेण्यास काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मंगळवारी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना केला. काँग्रेस पक्षाला चर्चेत स्वारस्य नाहीच; पण संसद चालविण्यासही हा पक्ष विरोध करीत असल्याचेही ते म्‍हणाले.

अधिक वाचा 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास गेल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. मात्र पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मागण्यांवरून विरोधकांनी घातलेल्या राडेबाजीमुळे कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत संसदेतील गतीरोधावर चर्चा करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी तसेच इतर नेते बैठकीस उपस्थित होते.

काँग्रेसने संसदेचे कामकाज ठप्प केले आहे. लसीकरणाच्या विषयावर आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीदेखील काँग्रेस गैरहजर होती.

15 ऑगस्टला स्वतंत्रता दिवस पार पडल्यानंतर भाजपच्या सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन काँग्रेसच्या या बेजबाबदारपणाची माहिती जनतेला द्यावी,  असे निर्देश मोदी यांनी बैठकीदरम्यान दिले.

अधिक वाचा 

पावसाळी अधिवेशनात एकही दिवस धडपणे कामकाज होऊ शकलेले नाही.

विशेषतः पेगासस हेरगिरी प्रकरणावरून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष आक्रमक आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशावरून पत्रकार, नेते, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, न्यायमूर्ती तसेच इतर क्षेत्रातील लोकांची हेरगिरी करण्यात आल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे.

हेही वाचलं का ?

Back to top button