सातारा : दुचाकी चोर पोलिसांनी 24 तासाच्या आत केले गजाआड | पुढारी

सातारा : दुचाकी चोर पोलिसांनी 24 तासाच्या आत केले गजाआड

खटाव : पुढारी वृत्तसेवा
पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातून होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरुन नेणार्‍या माण तालुक्यातील दिवडी येथील हणमंत भगवान पाटोळे याला पुसेगाव पोलिसांनी 24 तासाच्या आत गजाआड केले.

याबाबत पुसेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटोळे याने पुसेगावमधील छत्रपती शिवाजी चौकातून दि. 28 फेब्रुवारी रोजी रात्री दुचाकी चोरुन नेली होती. दुचाकी मालक केदारसिंह तारळकर यांनी दि. 1 मार्च रोजी पुसेगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीबाबत फिर्याद दिली होती.

सपोनि संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक बाळासाहेब लोंढे, सुनील अबदागिरी, वैभव वसव, सचिन जगताप, विजय खाडे, विपुल भोसले यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्यागोपनीय माहितीवरुन दिवडी येथील हणमंत पाटोळेला 24 तासाच्या आत 65 हजारांच्या दुचाकीसहताब्यात घेऊन त्याला गजाआड केले.

Back to top button