विजापूरहून आलेला १३ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त | पुढारी

विजापूरहून आलेला १३ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

विटा; पुढारी वृत्तसेवा : विजापूरहून खटाव (जि. सातारा) कडे नेत असलेला अवैध सुगंधीत तंबाखु, पानमसाला आणि गुटख्याचा ५१ पोत्यांतला १३ लाख ६५ हजाराचा साठा पकडून जप्त करण्यात विटा पोलिसांना यश आले. याप्रकरणी संबंधित चारचाकी गाडीसह चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम (वय २२, रा. दारुज ता.खटाव, जि. सातारा) यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्यांच्याकडील मुद्देमालासह गाडीही जप्त केली आहे.

याबाबत विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे म्हणाले की आज सकाळी गुहागर ते विजापूर मार्गावर विजापूरकडुन एक बुलेरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेला अवैध रित्या गुटखा वाहतुक करत आहे, अशी आम्हाला टीप मिळाली. त्यावर आम्ही विटा पोलिसांची पथक घेऊन भिवघाट (ता.खानापूर) येथे गेलो. तेथे जावून सापळा रचला असता, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक बुलेरो पिकअप गाडी येत असल्याचे दिसली त्यास इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले असता तो तेथून तडक निघून गेला. त्याचा पाठलाग करून आम्ही पिकअप गाडी (नं एम.एच. ११डी.डी ४३९०) पकडून त्यातील चालक ऋषिकेश कदम हटकले असता,गाडीच्या पाठीमागील हौदयात द्राक्ष भरण्याचे कॅरेट मध्ये महाराष्ट्रात शासना च्यावतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला आणि गुटखा यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे १३ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा विमल गुटखा होता.त्यावर आम्ही विमल गुटखा आणि बलेरो गाडी सह एकूण २० लाख ६५ हजार रुपये रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला तर संबंधित चालक ऋषिकेश कदम यास अटक करण्यात आलेली आहे

Back to top button