सांगली : द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची ७१ लाखाची फसवणूक; व्यापारावर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची ७१ लाखाची फसवणूक; व्यापारावर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : डफळापूर (ता. जत) येथील १५ शेतकऱ्यांचा द्राक्षमाल खरेदी करत पुन्हा पैसे देतो असं सांगत एका व्यापाराने ७१ लाख ५३ हजाराची फसवणूक केली आहे. याप्रकरणी व्यापारी शशांक शामराव सरगर (रा. खलाटी ता.जत) याच्याविरोधात जत पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची फिर्याद रमेश सुभाष गायकवाड यांनी जत पोलिसात दिली आहे. या घटनेने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. असा जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दलालानी चुना लावला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, डफळापूर येथील शेतकरी रमेश गायकवाड यांनी 2023 या वर्षीच्या द्राक्ष हंगामात मार्च व एप्रिल या कालावधीत शेजारील खलाटी येथील शशांक सरगर यास द्राक्ष विक्री केली होती.

यावेळी द्राक्षमाल गाडीत भरला की पैसे देण्याचे ठरले होते. परंतु, संशयित सरगर यांनी दिवसात दोनच दिवसात पैसे देतो असे सांगून द्राक्ष खरेदी केली. गायकवाड यांचे एकूण बारा लाख न देताच सरगरने पलायन केले आहे. आरोपी शशांक सरगर यांच्याकडे अधून मधून पैसे विषयी विचारणा केली जात होती. परंतु, त्याचा फोन देखील बंद आहे .याचबरोबर डफळापूर मधील आणखी गावातील १४ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी देखील याबाबत फिर्याद दिली आहे.

यामध्ये संभाजी तुकाराम कदम (९ लाख २७ हजार), बाळासाहेब दशरथ कदम (१ लाख), विजय गणपतराव चव्हाण (१ लाख १ हजार ५००), महादेव कल्लाप्पा परीट (२ लाख), सुरज प्रकाश दुगाणी (२ लाख ९० हजार), राहुल मनोहर चव्हाण (४ लाख), संजय संभाजी संकपाळ (२ लाख ५० हजार), राजेंद्र मारुती माळी (२लाख ३५ हजार), वसंत संभाजी माळी (८लाख), अशोक छत्रे (११ लाख), अजित सखाराम चव्हाण (३ लाख ६० हजार), सयाजी संभाजी संकपाळ (५० हजार), महादेव लिंगेश शांत (१० लाख), अजित सुभाष चव्हाण (१ लाख ४०) हजार असे एकूण शेतकऱ्यांचे ७१ लाख ५३ हजार ५०० रुपयाची शशांक सरगर या दलालांने मोठी फसवणूक केली आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

हेही वाचा;

Back to top button