भोसे येथे शेततळ्यात बुडून बालकाचा मृत्यू | पुढारी

भोसे येथे शेततळ्यात बुडून बालकाचा मृत्यू

मिरज, पुढारी वृत्तसेवा : भोसे (ता. मिरज) येथे शेततळ्यात बुडून बालकाचा मृत्यू झाला. आदेश राजकुमार शिंदे (वय 3) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, भोसे येथे मिरज-पंढरपूर महामार्गालगत शिंदे वस्ती येथे शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. आदेश शिंदे हा शनिवारी दुपारी घराजवळ खेळत होता. आदेश हा खेळत-खेळत शेतामध्ये असलेल्या शेत तळ्यावाजवळ पोहोचला. त्यानंतर त्याचा तोल गेल्याने तो शेततळ्यात पडला. बराच वेळ झाला आदेश कोठेही दिसला नसल्याने शिंदे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सुमारे दोन ते तीन तास शोध घेऊन देखील आदेश हा मिळून आला नाही. त्यानंतर शिंदे कुटुंबीयाने शेततळ्यात पाहणी केली असता आदेश याचा बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. आदेशाचा मृतदेह पाहताच कुटुंबीयानी हंबरडा फोडला. आदेश शिंदे याचे मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Back to top button