मिरज : मारहाण करून तरुणाला इलेक्ट्रिक शॉक दिले | पुढारी

मिरज : मारहाण करून तरुणाला इलेक्ट्रिक शॉक दिले

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  पायाप्पाचीवाडी (ता. मिरज) येथे मुलीचे फोटो मोबाईलमध्ये ठेवल्याने व तिला भेटल्याच्या कारणातून एकाला बेदम मारहाण करून इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रकार घडला. सूरज संजय कदम (वय 26, रा. डोंगरवाडी, ता. मिरज) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सूरज याने विठ्ठल वसंत कदम (वय 40, रा. डोंगरवाडी, ता. मिरज) आणि गणेश पाटील (वय 35, रा. आरग, ता. मिरज) व अन्य चौघांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज कदम हा तरुण गुरुवारी (दि. 24) रात्री डोंगरवाडी येथून निघाला होता. त्यावेळी वरील संशयितांनी त्याला गाठले. संशयितांनी सूरज याला जरा काम आहे चल, असे म्हणून मोटारसायकलवरून बसवून पायाप्पाचीवाडी कॅनॉलजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी संबंधित मुलीचे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये ठेवायचे नाही, तसेच तिला भेटायचे नाही, असे म्हणून संशयितांनी सूरज याला उसाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर इलेक्ट्रीक बॅटरीने सूरज याच्या पाठीत शॉक देऊन गंभीर जखमी केले असल्याचे त्याने दिलेल्या फियादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button