शिराळा तालुक्यात जोरदार पावसाचा सोयाबीन पिकाला फटका | पुढारी

शिराळा तालुक्यात जोरदार पावसाचा सोयाबीन पिकाला फटका

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा तालुक्यात पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. हातातोंडाला आलेली पिके पावसामुळे वाया जावू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीन काढणी व मळणी हंगाम सुरू झाला आहे. अचानक सोमवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. पावसामुळे मळणी कामे खोळंबली तर काही शेतकऱ्याची सोयाबीन पिके पावसात भिजली आहेत. पावसामुळे शेतकऱ्याची तारांबळ उडाली. सोयाबीन पिके भिजल्यामुळे दर मिळत नाही यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळतो. परंतु मॉईश्चरमुळे हातात काहीच पडत नाही. याशिवाय मॉईश्चर नावाखाली शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. वरिष्ठांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे असे एका शेतकऱ्यांने म्हटलं आहे.

तसेच किती मॉईश्चर किती दर याचे दर पत्रक नाही. सर्व काही मनमानी कारभार सुरू आहे. आधारभूत किंमत एक पण शेतकऱ्यांना पदरात काहीच पडत नाही. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन काढता येत नाही. एकिकडे पावसामुळे सोयाबीनला कोंब आले आहेत. तर दुसरीकडे मजूरांचे दर वाढवले आहेत. एकरी तीन हजारपेक्षा अधिक दर घेत आहेत. खरिप हंगामातील भात पिकेदेखील पावसामुळे आडवी झाली आहेत. तालुक्यात मुख्य पीक भात असून भात पिकाचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर आहे. भात पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button