सांगली : बानोच्या बलात्कार्‍यांना गजाआड करा | पुढारी

सांगली : बानोच्या बलात्कार्‍यांना गजाआड करा

सांगली ः पुढारी वृत्तसेवा बिल्किस बानोच्या 11 बलात्कार्‍यांची गुजरात सरकाने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी सुटका केली. त्यांना पुन्हा गजाआड करण्यात यावे, या मागणीसाठी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येथील स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.

बिल्किस बानो हिच्यावर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा खून करून अवघे कुटुंब संपविले. परंतु, हिंमत न हारता बिल्किस बानोने प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबईमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने 11 जणांना जन्मपेठेची शिक्षा सुनावली. बिल्किसला न्याय मिळाला, असे वाटले होते.

परंतु गुजरात सरकारने बिल्किस बानोच्या 11 बलात्कार्‍यांची नियमबाह्य सुटका केली. हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळिमा फासणारे असून न्यायिक व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारे आहे. बलात्कार्‍यांची सुटका करण्याची नियमांमध्ये कुठलीही तरतूद नसताना गुजरात सरकाने हा निर्णय घेतला. या संदर्भात केंद्र सरकाने लक्ष घालावे, या मागणीसाठी निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता म्हेत्रे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सुस्मिता जाधव, वंदना चंदनशिवे, वैशाली कळके, ज्योती अदाटे, हरिदास पाटील, समीर कुपवाडे आदी उपस्थित होते.

Back to top button