सांगली : जतमध्ये विजेची तार अंगावर पडून दोन तरुणाचा मृत्यू | पुढारी

सांगली : जतमध्ये विजेची तार अंगावर पडून दोन तरुणाचा मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : शहरातील घाडगेवाडी रस्त्याजवळील पाटील मळा येथे विजेची तार तुटून दोन तरुणांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी, (दि.२५ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित अजित पाटील (वय १६) व शिवाजी पांडुरंग महारनुर (वय .२६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जत घाडगेवाडी रस्त्यावर पाटील वस्ती येथे गुरुवारी सायंकाळी तरुण शेतकरी रोहित पाटील व शिवाजी महारनुर हे दोघे शेतात काम करत होते. याचवेळी शेतातून गेलेली ११ केव्ही विजेची मुख्य विद्युत वाहक तार तुटून रोहित पाटील यांच्या अंगावर पडली, या विजेच्या तारेपासून रोहितला बाजुला करताना त्याचा दुसरा मित्र शिवाजी महारनुर यालाही विजेचा जोरदार शॉक बसला. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तसेच रोहित याच्या आईला देखील त्यांना वाचवताना दुखापत झाली आहे..

पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद नव्हती. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते.

Back to top button