भारत-पाक युद्धातील रणगाडा सांगलीत | पुढारी

भारत-पाक युद्धातील रणगाडा सांगलीत

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेला रणगाडा सांगलीत दाखल झाला आहे. रंगरंगोटी करून तो प्रतापसिंह उद्यानात बसवला जाणार आहे. लवकरच तो नागरिकांसाठी खुला होणार आहे. उद्यानात शिवसृष्टीही साकारली जाणार आहे. सांगलीचे प्रतापसिंह उद्यान आणि शिवसृष्टी महत्त्वाचे आकर्षणस्थळ ठरणार आहे.

सांगलीतील प्रतापसिंह उद्यानाला ऊर्जितावस्था देण्याच्या दृष्टीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. प्रतापसिंह उद्यानात शिवसृष्टी

साकारण्याचा निर्णय घेतला आहे. सन 1971 च्या युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेला रणगाडा या उद्यानात बसविण्यात येणार आहे. हा रणगाडा सांगलीत दाखल झाला आहे. त्याची रंगरंगोटी सुरू आहे. प्रतापसिंह उद्यानात दगडी बांधकामाचा भक्कम असा कट्टा बांधण्यात आला आहे.

या कट्ट्यावर शनिवारी हा रणगाडा बसवला जाणार आहे. रणगाडा बसवल्यानंतर उर्वरित काम होईल. दि. 15 ऑगस्टच्या दरम्यान हा रणगाडा नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला जाणार आहे.

प्रतापसिंह उद्यानात शिवसृष्टी आणि अन्य सुशोभीकरण केले जाणार आहे. उद्यानाचे रूप पालटू लागले आहे. लवकरच सांगलीचे प्रतापसिंह उद्यान आणि शिवसृष्टी आकर्षण ठरणार आहे.

Back to top button