कवठेमहांकाळमध्ये पार पडले आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रशिक्षण | पुढारी

कवठेमहांकाळमध्ये पार पडले आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रशिक्षण

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ येथे आंबा बागेतील ‘पॅक्लोबुट्राझोल’ चा वापर या विषयीचे जिल्हांतर्गत शेतकर्‍यांचे प्रशिक्षण झाले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यातर्फे हे प्रशिक्षण देण्यात आले. यात तालुक्यातील दीडशेहून अधिक आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी उपस्थिती दाखवली.

प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी एम.जे.तोडकर यांनी केले. अलंटा सुपर कंपनीचे रामचंद्र वाघ यांनी उपस्थित शेतकर्‍यांना आंबा पिकामध्ये पॅक्लोबुट्राझोलचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी आंबा पीक लागवड, खत व्यवस्थापन, पॅक्लोबुट्राझोल विषयी समज गैरसमज, कीड व रोगांचे व्यवस्थापन त्याचबरोबर सेंद्रिय निविष्ठांचा वापर याबाबत सविस्तर माहिती देवून उपस्थित बळीराजाच्या शंकाचे निरसन केले.

प्रशिक्षण कार्यक्रमानंतर उपस्थितांना भारत बोंगाळे यांच्या आंबा बागेत जाऊन पॅक्लोबुट्राझोलच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Back to top button