जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला ‘नकुशी’ झाली ‘हवीशी’ | पुढारी

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला ‘नकुशी’ झाली ‘हवीशी’

सांगली : संजय खंबाळे

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात तीन वर्षांत 1 लाख 31 हजार 819 जणांचा जन्म झाला आहे. यामध्ये 68 हजार 987 बालक आणि 62 हजार 444 बालिका आहेत. तर 388 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. 2019-20 मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 912.44 होते. 2021-20 मध्ये हे प्रमाण 880.66 झाले होते, तर 2021-22 मध्ये हाच जन्मदर 923.79 पर्यंत वाढला आहे. दोन वर्षांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.पिढ्यान्-पिढ्या ‘मुलगा हाच वंशाचा दिवा’, ही मानसिकता आहे. यामुळे मुलींचे प्रमाण कमी झाले.

परिणामी आता मुलांच्या लग्नाबाबत अनेक अडचणी येत आहेत. काही वर्षापासून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. सध्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘सुकन्या’, ‘माझी कन्या भाग्यश्री’ अशा योजना राबविण्यात येत आहेत. दुसर्‍या बाजूला प्रसूतीपूर्व लिंगनिदान बंदी कायदा कडक करण्यात आला. परिणामी मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे.

जिल्ह्यात 2019-2020 या कालावधीत खासगी आणि सरकारी रुग्णालयात 45 हजार 914 बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये 24 हजार 8 बालक तजिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला‘नकुशी’ झाली ‘हवीशी’र 21 हजार 906 बालिका आहेत. त्यावर्षी हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 912.44 इतका होता. तसेच 2020-21 या वर्षात 44 हजार 190 जणांचा जन्म झाला आहे. यात 23 हजार 497 बालक आणि 20 हजार 693 बालिका आहेत. त्यावर्षी मुलीचा जन्मदराचा टक्का 880.66 पर्यंत घसरला होता. 2021-22 या वर्षात 41 हजार 327 बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये 21 हजार 482 बालक तर 19 हजार 845 बालिका होत्या. यावर्षी मुलीचे प्रमाण 923.79 टक्क्यापर्यंत वाढले आहे. तीन वर्षांच्या तुलनेत मुलीचा जन्मदर 905 इतका आहे.

शिक्षण आणि जनजागृतीमुळे आई-वडिलांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे चित्र आहे. नोकरी, व्यवसाय करण्यासाठी ते मुलींना पाठबळ देत आहेत. आज डिजिटलच्या युगात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत मुली- मुलांच्या खांद्याला खादा लावून काम करीत आहेत. शासन, प्रशासन यांनी अशीच जनजागृती चालू ठेवली तर हजार मुलांमागे एक हजार मुली असे प्रमाण राहू शकेल.

जिल्ह्यात तीन वर्षांत 388 नवजात बालकांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 1 लाख 31 हजार 819 बालकांचा जन्म झाला आहे. मात्र जन्मतः कमी वजन, जंतू संसर्ग अशा काही कारणांमुळे यातील 388 बालकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1 लाख 31 हजार 431 बालके जगली आहेत.

लिंगनिदानाची चोरीछुपके तपासणीची सर्वत्र चर्चा

जिल्ह्यात यापूर्वी लिंगनिदान करून गर्भपात करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही वर्षांपासून प्रसूतीपूर्व लिंगनिदान विरोधी कायदा कडक केला आहे. यामुळे या प्रकाराला काहीसा आळा बसला आहे. मात्र आजही काही ठिकाणी भरमसाठ पैसे घेऊन काहीजण लिंगनिदान करीत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात पूर्णपणे गर्भपात रोखल्यास मुलींच्या जन्मदराचे प्रमाण आणखी वाढणार आहे. चोरीछुपके सुरू असणार्‍या लिंगनिदान केंद्रावर सतत करडी नजर व कारवाईची गरज आहे.

  • 2020-21 मध्ये 880.66 तर प्रमाण 2021-22 मध्ये झाले 923 तीन वर्षांत 68,987 मुले, 62,444 मुलींचा जन्म

मुलीचा जन्मदर वाढण्यासाठी आमची सर्वच टीम वेळोवेळी जनजागृती करीत असते. तसेच आज सुशिक्षितांचे प्रमाण वाढल्याने मुलगा-मुली असा भेदभाव करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलींचा जन्मदर वाढतोय ही अभिमानाची गोष्ट आहे. यामध्ये आणखी वाढ होण्यासाठी प्रयत्न करू.

– जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली

Back to top button