‘पुढारी एज्युदिशा’ प्रदर्शनाचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ सांगली | पुढारी

‘पुढारी एज्युदिशा’ प्रदर्शनाचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ सांगली

सांगली,  पुढारी वृत्तसेवा : 
दै. ‘पुढारी’ आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्युदिशा 2022 या शैक्षणिक प्रदर्शनाचा सांगली, मिरज शहराबरोबर जिल्ह्यात कानाकोपर्‍यांतून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी-पीसीसी, लातूर हे होते. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्‍लासेस, लातूर तर अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे व सिम्बायसिस, पुणे हे सहप्रायोजक होते.

संजय घोडावत विद्यापीठचे विश्‍वस्त विनायक भोसले यांचे भाषण झाले. संजय घोडावत विद्यापीठचे डॉ. अरुण पाटील यांचे ‘उच्च शिक्षणाचे महत्त्व, आव्हाने आणि संधी’ या विषयांवर व्याख्यान झाले. एमआयटी एडीटीचे नागेश जाधव यांनी ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी’ या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रा. शिराज भाटकर यांनी ‘पेट्रोलियम इंजिनिअरिंग’ यावर मार्गदर्शन केले. ‘परदेशी शिक्षण आणि करिअरच्या संधी’ या विषयांवर प्रा. जयंत पाटील यांचे व्याख्यान झाले.

शनिवारी सिम्बायसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुण्याचे प्रा.अमीर शिकलगार यांनी ‘कौशल्यावर आधारित 21 व्या शतकातील रोजगाराभिमुख संधी’ या विषयांवर मार्गदर्शन केले. ‘यूपीएससी आणि एमपीएससीमधील करिअरच्या संधी’, या विषयांवर पुणे येथील युनिक अकॅडमीचे प्रा. पी. डी. चव्हाण यांचे मार्गदर्शन झाले. ‘शिक्षण आणि करिअरच्या संधी’, या विषयांवर सातारा येथील यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील प्रा. रणधीरसिंह मोहिते यांनी मार्गदर्शन केले. फ्रेम बॉक्स, पुण्याचे अमित क्षेत्री यांनी ‘अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील करिअरच्या संधी‘ या विषयांवर मार्गदर्शन केले.

रविवारी पुणे येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातील डॉ. राकेश आफरे यांचे इंजिनिअर कसे घडतात, याबाबत व्याख्यान झाले. ‘इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी’, या विषयी एमआयटी-एओईचे अनिकेत बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. मनीषा कुंभार यांचे ‘12 वी नंतरच्या संधी’ या विषयी व्याख्याने झाले. ‘नीटची तयारी’ या विषयी आयआय बीपी सीबी क्‍लासेस लातूर, नांदेडचे प्रा. चिराग सेनमा यांनी मार्गदर्शन केले. प्रा. मोटेगावकर सरांचे आर. सी. सी. क्‍लासेस, लातूरचे प्रा. एम‘. के. कुरणे यांनी नीट/जीईईबाबत मार्गदर्शन केले.

Back to top button