महाडमध्ये अनोखी होळी : देव-दानव युद्धाची परंपरा; ग्रामस्‍थांच्या दोन गटात निखारे फेकुन होते युद्ध | पुढारी

महाडमध्ये अनोखी होळी : देव-दानव युद्धाची परंपरा; ग्रामस्‍थांच्या दोन गटात निखारे फेकुन होते युद्ध

रायगड ; पुढारी वृत्‍तसेवा रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळ आळी येथे अनोख्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा केला जातो. होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देव-दानवाचं युध्द खेळल जातं. हि एक अनोखी परंपरा महाड शहरातील गवळ आळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासुन चालु आहे.

गवळ आळीमध्ये पारंपारीक पध्दतीने होळी लावली जाते. होळी दहन झाली कि या ठिकाणी ग्रामस्थांमधील दोन गटात प्रतिकात्मक युध्द खेळले जाते. या युध्दात होळीतील जळकी लाकडे, निखारे फेकण्याची परंपरा आहे. पाहताना अंगावर शहारे यावेत अशा पद्धतीने हे युद्ध खेळले जाते. गावातील ग्रामस्‍थांमध्येच दोन गट पाडले जातात. यावेळी देव-दानव यांच्या प्रतिकात्‍मक स्‍वरूपात हे युद्ध खळले जाते. यावेळी दोन्ही बाजुच्या लोकांकडून एकमेकांवर जळती लाकडे फेकली जातात. हे युद्ध पाहण्यासाठी नागकांची मोठी गर्दी असते. या यद्धात तरूण मोठ्या संख्येने सहभागी झालेले असतात.

हेही वाचा :

Back to top button