पनवेल पालिकेच्या सरळ सेवा भरतीने पालिकेच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! | पुढारी

पनवेल पालिकेच्या सरळ सेवा भरतीने पालिकेच्या तिजोरीत पैशांचा पाऊस!

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरतीच्या अर्जाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. लाखो उमेदवारांनी ३७७ जागासाठी नोंदणी केली आहे. या लाखो उमेदवाराच्या अर्ज शुल्कामुळे पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत पैशांचा पाऊस पडला आहे. अर्ज शुल्कातून ३ कोटी ६४ लाख ४३ हजार रुपये पालिकेचे तिजोरीत जमा झाले आहे. शुक्रवार (दि. १५ सप्टेंबर) रोजी रात्री ११ पर्यत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवाराची संख्या तर वाढेल. त्यासोबत पालिकेचा तिजोरीत अन्य काही रक्कम जमा होणार आहे.

२०१६ मध्ये पालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच पालिकेमार्फत ४१ पदाच्या ३७७ जागेसाठी सरळसेवा भरती काढली आहे. या भरतीसाठी बेरोजगार उमेदवाराकडून अर्जाचा पाऊस पडला आहे. १४ सप्टेंबरपर्यत १ लाख १५ हजार उमेदवारांनी भरती प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी केली आहे. या लाखो उमेदवारांपैकी ५१ हजार ३६३ उमेदवारांनी कागदपत्राची पूर्तता करून पूर्ण अर्ज भरले आहे. या लाखो उमेदवारानी नोंदणी करताना अर्ज शुल्क भरले आहे. या अर्ज शुल्कामुळे पालिकेच्या तिजोरीत पैश्याचा पाऊस पडला आहे.

१५ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ३ कोटी ६४ लाख ४३ हजार रुपये जमा झाल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे. या उमेदवारी अर्जासाठी शुल्क म्हणून ८०० ते १००० रुपये आकारणी करण्यात आली आहे. या सरळ सेवेच्या भरतीसाठी आत्तापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देऊन अर्ज मागविण्यात आले होते. १५ सप्टेंबर २०२३ ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख होती. पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही सरळ सेवा भरती प्रक्रिया पडणार आहे. टीसीएसमार्फत ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्रावर बसवणार नेटवर्क जामर  : कौलास गावडे ( उपायुक्त पनवेल महानगरपालिका )

पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत पहिल्यादाच ३७७ जागेसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने नेमलेल्या एका खाजगी कंपनीकडून  घेण्यात येणार आहे. लवकरच लेखी परिक्षेची तारीख देखील जाहिरात करण्यात येणार आहे. त्या सोबत भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रात कोणताही घोळ होऊ नये यासाठी विषेश काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर नेटवर्क जामर लावण्यात येणार असल्याची माहिती कैलास गावडे उपयुक्त पनवेल महानगरपालिका यांनी दिली आहे.

५१ हजार नोंदणी पूर्ण!

४१ पदांसाठी ३७७ जागेसाठी पालिकेकडून सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी १४ सप्टेंबरपर्यत १ लाख १५ हजार ७६६ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ५१ हजार उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पूर्ण भरले आहे.

हेही वाचा :  

Back to top button