सांगली : हिंगणगादे ते चिखलहोळ रस्त्यावर ऊस पिकाचे अतिक्रमण ! | पुढारी

सांगली : हिंगणगादे ते चिखलहोळ रस्त्यावर ऊस पिकाचे अतिक्रमण !

विटा; पुढारी वृत्तसेवा : हिंगणगादे ते चिखलहोळ या तीन किलो मीटर रस्त्यावर दोन किलोमीटरचे अतिक्रमण झाले असून त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी चक्क ऊस लावला आहे. अशी तक्रार रमेश मोहिते यांनी केली आहे.

याबाबत रमेश मोहिते म्हणाले, पूर्वी हिंगणगादे ते चिखलहोळ असा जवळपास ३ किलोमीटर इतका कच्चा रस्ता होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून हिंगणगादे ते चिखलहोळ रस्त्यास जुळणारा नागेवाडी ते गोडाचीवाडी येथील एक किलोमीटर रस्ता रहदारी युक्त राहिलेला आहे. त्या पुढचा दोन किलोमीटरचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद आहे. त्यामुळे हिंगणगादेतील लोकांना नागेवाडी मार्गे चिखलाहोळला जावे लागत आहे.

याशिवाय ऊस वाहतुकीलाही अडचण निर्माण झाली आहे. गोडाचीवाडीपर्यंत काही काळ एसटी ही जात होती. परंतु आता तीही बंद झाली आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडे परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी दिल्या. परंतु, आज अखेर काहीही कार्यवाही झालेली नाही अशी खंत मोहिते यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button