रायगड: कर्नाळा येथे शिवशाही बसला अपघात: २ जण जखमी | पुढारी

रायगड: कर्नाळा येथे शिवशाही बसला अपघात: २ जण जखमी

पेण : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा अभयारण्य हद्दीतील कचर तलावाजवळ शिवशाही बसला (एमएच-09-ईएन-9333) अपघात होऊन बस पलटी झाली आहे. पनवेल वरून महाडच्या दिशेने जात असलेल्या या बसमध्ये 37 प्रवासी होते. अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करत असताना कर्नाळा अभयारण्यातील ही धोकादायक वळणे काढण्याची मागणी वारंवार होत असतानाही महामार्ग प्राधिकरण विभागाकडे दुर्लक्ष करीत असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. आजच सकाळी याच तलावाजवळ चारचाकी वाहनांचे अपघात झाले आहे. तर गेल्या आठवडा भरात याच ठिकाणी लहान मोठे चार अपघात झाले असल्याची माहिती तारा यूसूफ मेहेरअली सेंटरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली आहे.

हेही वाचा

Back to top button