रायगड: सहा वर्षीय चार्वीचा जिम्नॅस्टिक प्रकारात जागतिक विक्रम | पुढारी

रायगड: सहा वर्षीय चार्वीचा जिम्नॅस्टिक प्रकारात जागतिक विक्रम

महाड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील तळा येथील चार्वी अभिजीत कोळवणकर हिने जिम्नॅस्टिक प्रकारातील पुलअप बारवर जास्तीतजास्त वेळ लटकून राहणे, या प्रकारात जागतिक विक्रम प्रस्थापित केला. तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या यशाबद्दल तिला पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
जिम्नॅस्टिक प्रकारातील पुलअप बारवर 3 मिनिटे 35 सेकंद आणि 5 मिली सेकंद इतका वेळ सलग लटकून राहिली. केवळ सहा वर्ष वयातील तिच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीची दखल घेत तिचा गौरव करण्यात आला.

चार्वी सध्या आई- वडिलासोबत पुणे येथील हडपसर येथे वास्तव्यास आहे. महाडच्या ज्येष्ठ समाजसेविका बेबीताई जैतपाल या तिच्या पणजी. चार्विला लहानपणापासूनच या खेळाची आवड निर्माण झाल्याने तिला बेंद्रे जिम्नॅस्टिकचे बेंद्रे यांच्याकडे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. लहान वयातीलच तिची चपळता थक्क करणारी असून मॅरेथॉन, पोहणे, वॉल क्लाइंबिंग, इनलाइन स्केटिंग यासारख्या इत्यादी अनेक प्रकारातील अनेक प्रकार ती लीलया करते.

व्यवसायाने वकील असणारे महाडचे सिद्धेश जैतपाल यांची ती भाची आहे. महाड येथे शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी चार्वीची भेट घेऊन तिचे अभिनंदन केले. रायगडवासियांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा 

Back to top button