रायगड बस अपघात : पंतप्रधानांकडून मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर | पुढारी

रायगड बस अपघात : पंतप्रधानांकडून मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील रायगड येथे बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी आशा आहे. राज्य सरकार बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे, असे ट्वीट पंतप्रधानांनी शनिवारी केले.

रायगडमधील बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून २ लाख रुपये मदत दिली जाईल. तर, जखमींना ५० हजारांची मदत केली जाईल, अशी माहिती पंतप्रधानांनी ट्विटर वरून दिली.

हेही वाचा 

Back to top button