होळी सणासाठी रेल्वेची कोकणवासीयांना भेट; २६ विशेष गाड्या धावणार | पुढारी

होळी सणासाठी रेल्वेची कोकणवासीयांना भेट; २६ विशेष गाड्या धावणार

रोहे; पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वेच्यावतीने कोकणवासीयांना प्रवास सुखकारक व्हावे यासाठी रोहा – चिपळूण दरम्यान अतिरिक्त होळी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. यासह होळी निमित्ताने विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे, अशी माहीती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाच्यावतीने देण्यात आले आहे.

रोहा चिपळूण दरम्यान चालविण्यात येणाऱ्या गाड्या मध्ये रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू ०१५९७ मेमू ट्रेन रोहा येथून दि. ४ ते १२ मार्च (९ सेवा) पर्यंत दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १३.२० वाजता पोहोचेल. तर ०१५९८ मेमू चिपळूण येथून दि. ४ ते १२ मार्च (९ सेवा) दररोज १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड असे असणार आहेत.

यासह रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाराणसी तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान होळी सण २०२३ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. मध्य रेल्वेने आधीच १०५ होळी विशेष ट्रेन सेवा चालवण्याची घोषणा केली आहे. या अतिरिक्त विशेषसह यंदाच्या होळी विशेषची एकूण संख्या १३१ असेल.
२६ विशेष मुंबई- वाराणसी ०१४६७ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता पोहोचेल. ०१४६८ सुपरफास्ट विशेष दि. ५ मार्च रोजी १८.१० वाजता बनारस येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २०.५० वाजता पोहोचेल. यासाठी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी हे थांबे देण्यात आले आहेत.

मुंबई – करमळी वातानुकूलित होळी विशेष

०११८७ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी १० वाजता पोहोचेल. ०११८८ विशेष गाडी करमळी येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. यासाठी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि हे थांबे देण्यात आले आहेत.

मुंबई – मंगळुरु वातानुकूलित होळी विशेष

०११६५ वातानुकूलित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता पोहोचेल. ०११६६ वातानुकूलित विशेष मंगळुरु जंक्शन दि. ८ मार्च रोजी १८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. यासाठी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरतकल आणि ठोकूर थांबे असे असणार आहेत.

Back to top button