अलिबाग : भाऊचा धक्का येथे प्रवासी बोटीला जलसमाधी

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील भाऊचा धक्का येथे आज (शनिवार) दुपारी समुद्रात एक प्रवासी बोट बुडाली. बोटीत केवळ बोटीचा चालक होता. त्याने प्रसंगावधान राखून तत्काळ समुद्रात उडी मारुन शेजारील बोटीचा आसरा घेतला. या बोटीत अन्य कोणीही प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली, अशी माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजीव सर्जेराव पाटील यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे.
बुडालेली बोट अन्य बोटींच्या सहाय्याने कालांतराने बाहेर काढण्यात आल्याचेही पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. भाऊचा धक्का येथील बंदरात उभ्या असणाऱ्या मोठ्या बोटींवरील खलाशी व कामगारांकरीता भाऊचा धक्का येथून अशा प्रकारच्या प्रवासी बोटीच्या माध्यमातून जीवनावश्यक सामान व रेशन घेऊन जाण्याची नियमित पद्धत आहे. त्यानुसार भाऊचा धक्क्यासमोरील बंदरात उभ्या असलेल्या एका मोठ्या बोटीकरिता या प्रवासी बोटीतून सामान घेऊन बोटचालक गेला होता. सामान मोठ्या बोटीवर दिल्यावर परतत असताना ही दुर्घटना घडली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?
- RaanBaazaar : तेजस्विनीसह प्राजक्ता झाली ‘बोल्ड’, ‘रानबाजार’चा टिझर रिलीज
- व्हायरल व्हिडीओ : ‘ही’ ऐश्वर्या रॉय आहे तरी कोण ? तिला पाहून चाहते झालेत वेडे
- Andrew Symonds : इंग्लंडमध्ये जन्मलेला अँड्र्यू सायमंड्सची ऑस्ट्रेलियात पोहोचण्याची ‘फिल्मी स्टोरी’!