

पुढारी ऑनलाईन डेस्क :
सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रॉयचा व्हिडीओ चांगलाच धूमाकूळ घालत आहे. यामध्ये दिसणारी व्यक्ती ही अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सारखीच आहे. ती ऐश्वर्यासारखीच दिसते. तिला नोटकऱ्यांकडून सोशल मीडियाची ऐश्वर्या राय म्हटले जात आहे.
ऐश्वर्या राय ही बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याची पत्नी आहे. या दोघांना एक मुलगी आराध्याही आहे. बहुतेक प्रसंगी ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या हे सोबतच दिसत असतात. पण सध्या ऐश्वर्या रायचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी ऐश्वर्याच्या चित्रपटातील गाण्यांवर नाचताना आणि व्हिडीओ क्लिप करताना दिसत आहे.
या मुलीला पाहताक्षणीच ही पूर्णपणे ऐश्वर्यासारखीच दिसते. तिला पाहून नेटकरी फसतात की ही खरंच ऐश्वर्या राय रॉय आहे. तिला सोशल मीडियाची ऐश्वर्या रॉय असे म्हटले जात आहे.या तरुणीच्या डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ही मुलगी ऐश्वर्याची सेम कॉपी आहे, हे पाहून चक्क अभिषेक बच्चनही विचारात पडेल, असे नेटकरी म्हणतात.
ऐश्वर्या रॉय सारखी दिसणार्या या तरुणीचे नाव आशिता राठोड आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हे याच नावावरून आहे. आशिता ही बहुतेक ऐश्वर्या रॉयच्या हिट गाण्यांवर व्हिडीओ बनवत असते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती ऐश्वर्याच्या 'मेरे दिल को ये क्या हो गया' या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. तर दुसर्या व्हिडिओमध्ये ती 'तेरी राहों में है' या गाण्यावर ओठांची हालचाल करताना दिसते. ऐश्वर्या रॉयचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांकडून खूप पसंत केला जात आहे. यावर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ही ऐश्वर्या आहे…?, आणखी एका चाहत्याने आश्चर्य व्यक्त करत लिहिले आहे, कोणी इतके समान कसे काय असू शकते.
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या साऊथच्या ' पोन्नियन सेल्वन ' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका आहे. या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ऐश्वर्या रॉय २०१८ मध्ये अनिल कपूरसोबत ' फन्ने खान ' या चित्रपटात दिसली होती.