RaanBaazaar : तेजस्विनीसह प्राजक्ता झाली 'बोल्ड', 'रानबाजार'चा टिझर रिलीज | पुढारी

RaanBaazaar : तेजस्विनीसह प्राजक्ता झाली 'बोल्ड', 'रानबाजार'चा टिझर रिलीज

पुढारी वृत्तसेवा : मराठमोळ्या अभिनेत्री तेजस्वीनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची प्लॅनेट मराठीवर एक वेब सिरीज ‘रानबाजार’ (RaanBaazaar) येत्या २० मे ला रिलीज होत असून आज त्याचा टिझर रिलीज झाला आहे.

RaanBaazaar : वेब विश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’

यामध्ये त्या दोघींची बोल्ड भूमिका दिसून येत असून याबद्दल तेजस्विनी पंडितने आपल्या इंस्टाग्राम वर वेब विश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ असा उल्लेख केला आहे. प्राजक्ता माळीनेही दुसरा टिझर शेअर करत आपल्या भूमिकेबद्दल थोडक्यात लिहलं आहे. यामध्ये ती मते की, ‘प्रत्येक कलाकाराला विविधांगी भूमिका साकारण्याची इच्छा असते, मी सुद्धा लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना पाहत त्यांना आदर्श मनात आली आहे.’

व्हायरल व्हिडीओ : ‘ही’ ऐश्वर्या रॉय आहे तरी कोण ? तिला पाहून चाहते झालेत वेडे

रेगे, ठाकरे असे चित्रपट बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे यांची ही वेब सिरीज प्लॅनेट मराठीवर २० मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मराठी चित्रपट

हे वाचलंत का?

Back to top button