पनवेल : आत्महत्या करण्यासाठी युवक चढला ट्रान्सफॉर्मरवर | पुढारी

पनवेल : आत्महत्या करण्यासाठी युवक चढला ट्रान्सफॉर्मरवर

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई परिरातील कामोठे येथील देशी धाब्याच्या शेजारील सेक्टर १९, प्लॉट नं. ८० या मोकळ्या भूखंडावर असलेल्या उच्चदाब विद्युत ट्रान्सफॉर्मरवर आत्महत्या करण्यासाठी एक युवक चढल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कामोठे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून युवकाची समजूत काढण्यात येत आहे. हा युवक कोण आहे? आणि आत्महत्या करण्यासाठी तो वर का चढला आहे ?, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button